लेखिका: Dr. Nikita Karwa, EduFest Academy · 06 Oct 2026

ATP ची जाहिरात कधी येणार? सध्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे. जाहिरात येणार का, किती पदे असतील, परीक्षा कधी होईल, हे प्रश्न स्वाभाविक आहेत. पण आजच्या तारखेला याबद्दल काहीच clear नाही, आणि अधिकृत माहिती येईपर्यंत ते कोणालाच clear सांगता येणार नाही. म्हणूनच अंदाजांवर विश्वास ठेवून निर्णय घेणं योग्य नाही.

सध्या अनेक विद्यार्थी तयारी सुरू करण्याच्या खूप घाईत दिसतात. त्यांच्यासाठी हे पोस्ट आहे.


1. जाहिरात आली, तरी तयारीसाठी वेळ मिळतो

समजा 2027 मध्ये जाहिरात आलीच. तरीही notification आणि actual exam यामध्ये तयारीसाठी आपल्याला काही कालावधी नक्की मिळतो. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

मागील 2018, 2022 आणि 2024 च्या pattern कडे पाहिलं, तर notification ची date आणि exam ची date यामध्ये किती वेळ मिळाला होता, हे तुम्हाला स्वतः तपासता येईल. त्यातून एक गोष्ट लक्षात येते:

Notification नंतर तयारी सुरू केली, तरी योग्य planning असेल तर preparation + revision + 1–2 rounds of review व्यवस्थित करता येऊ शकतात.

म्हणजे "आत्ता सुरू केलं नाही तर सगळं संपलं" ही भीती अनावश्यक आहे. Official notification आल्यानंतर हातात असलेल्या वेळेचा आपण 100 नाही, तर 200 टक्के उपयोग करून घेऊ शकतो.


2. सर्वात महत्त्वाची गोष्ट: तुमचा job किंवा दुसरी परीक्षा सोडू नका

तुमच्याकडे सध्या job असेल, किंवा तुम्ही दुसऱ्या परीक्षेची तयारी करत असाल, तर ती नक्की सोबत continue करा.

ATP ची जाहिरात कधी येईल, याबद्दल सध्या काही clear नाही. जोपर्यंत ते clear होत नाही, तोपर्यंत तुमच्या हातातली सध्याची opportunity सोडू नका. निश्चित गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे जाणं हा सर्वात मोठा धोका आहे.

  • आधी तुमच्याकडे असलेल्या opportunities continue करा.
  • त्यासोबत ATP ची तयारी करता येत असेल, तर नक्की करा.
  • Job सोडून किंवा इतर परीक्षा थांबवून फक्त ATP वर अवलंबून राहण्याचा निर्णय घाईत घेऊ नका.

3. आत्ता काय करायचं?

आत्तापासून काहीच अभ्यास करू नका, असा याचा अर्थ अजिबात नाही. ज्याचा अभ्यास आत्ता करता येतो, तो सुरू ठेवा.

  • Valuation सारखे topics तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता.
  • काही topics साठी नवीन syllabus किंवा MR & TP Act मधील amendments बाबत अधिकृत clarity मिळणं आवश्यक आहे. त्या topics साठी थोडं थांबणं योग्य ठरेल.
  • तुम्ही fresher असाल तरीही तयारी व्यवस्थित सुरू करता येते.

मोफत resources, आत्ताच उपलब्ध:

  • EduFest Academy YouTube Channel वर free lectures उपलब्ध आहेत.
  • EduFest Academy website वर past question papers, previous syllabus आणि अभ्यासासाठी आवश्यक इतर resources उपलब्ध आहेत. ते नक्की बघा.

4. अधिकृत माहिती काय सांगते? (RTI उत्तर)

अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत स्रोत पाहूया. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर नगर विकास विभागाकडून आलेल्या उत्तरातले मुद्दे:

  • सहाय्यक नगर रचनाकार, श्रेणी-१, गट-ब या संवर्गाची सध्या 255 पदे रिक्त आहेत.
  • MPSC च्या जाहिरात क्र. 051/2024 च्या शिफारस यादीनुसार 140 सहायक नगर रचनाकारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे.
  • नवीन भरतीसाठी मागणीपत्र MPSC कडे पाठवण्याचा प्रस्ताव अजून शासन स्तरावर विचाराधीन आहे. कार्यवाही पूर्ण झालेली नाही.

म्हणजेच, अधिकृतपणे सध्या हे प्रकरण विचाराधीन आहे आणि जाहिरातीची वेळ किंवा पदसंख्या अजून ठरलेली नाही. अशा वेळी कोणीही सांगितलेल्या तारखा किंवा आकडे ही फक्त अटकळ आहे.


5. Classes कधी?

Online Live Classes आपण नक्की घेणार आहोत, याची 100% खात्री समजा.

मात्र MPSC ATP बद्दल चित्र स्पष्ट होईपर्यंत आम्ही कोणतेही classes सुरू करत नाही आहोत. अपुऱ्या माहितीवर batch सुरू करून तुमचा वेळ आणि पैसा धोक्यात घालणं आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे अजून साधारण एक महिना थोडा धीर धरा. या काळात जाहिरात, परीक्षा आणि syllabus याबाबत परिस्थिती स्पष्ट होईल. त्यानंतर आपण अधिक नियोजनबद्ध पद्धतीने तयारीला सुरुवात करू.

तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. Planning, strategy, guidance आणि revision यासाठी EduFest Academy तुमच्यासोबत असेल.


थोडक्यात

  • ✅ अधिकृत माहिती clear होईपर्यंत वाट बघा.
  • ✅ ज्याचा अभ्यास करता येतो, तो आत्तापासून सुरू ठेवा.
  • ✅ Job असेल तर job continue करा.
  • ✅ दुसऱ्या परीक्षेची तयारी करत असाल तर तीही सोबत करा.
  • ✅ Notification आणि exam मध्ये तयारीला वेळ मिळतोच, म्हणून unnecessary pressure घेऊ नका.
  • ❌ अफवांवर विश्वास ठेवून घाईचा निर्णय घेऊ नका.

थोडा धीर धरा. तयारी सुरू ठेवा. Official information ची वाट बघा.

You are sharp enough to take the right decision for yourself. ❤️

- Dr. Nikita Karwa
EduFest Academy